अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ, तिच्या दुस -या लग्नामुळे चर्चेत आहे, आता तिनं नुकतंच यश दास गुप्तासोबत एक फोटोशूट केलं ज्यात दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. नुसरतने अलीकडेच तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे संकेत दिले की तिने यशशी लग्न केलं आहे. आता दोघांचे फोटो बघून स्पष्टपणे असे म्हणता येईल की ते पती -पत्नी झाले आहेत.
मुलाच्या वडिलांबद्दल नुसरत जहाँला खूप ट्रोल केलं गेलं. वास्तविक नुसरतने मुलाच्या वडिलांचं नाव उघड केलं नव्हतं परंतु नंतर मुलाचे जन्म प्रमाणपत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं, ज्यात मुलाच्या वडिलांचं नाव यश दासगुप्त असं लिहिलं होतं.
नुसरत जहाँने अलीकडेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यावरून ती यशदास गुप्ताशी विवाहबद्ध असल्याचे उघड होत आहे. नुसरत सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि चाहत्यांना तिचे फोटो खूप आवडतात.
आता नुसरत आणि यश यांचे हे फोटो सांगत आहेत की दोघांनी लग्न केलं आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
काही दिवसांपूर्वी नुसरत पती निखिल जैन यांच्याशी झालेल्या वादामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचं लग्न तुटल्याच्या बातमीने बरीच खळबळ उडाली. दोघांनी 2019 मध्ये लग्न केलं आणि काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. नुसरतचे माजी पती निखिल जैन यांनी हे मूल आपलं नसल्याचं सांगत मोठे विधान केलं होतं.