शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स आॅफिसवर धमाका करत होता. मात्र, आता बाॅक्स आॅफिसवर पठाणची हवा कमी झाल्याचे दिसत आहेत.
पठाण चित्रपटाने जरी धमाकेदार कामगिरी बाॅक्स आॅफिसवर केली असली तरीही बाहुबली २ चित्रपटाचे रेकाॅर्ड मागे टाकण्यात अजून पठाण चित्रपटाला यश मिळाले नाहीये.
जगभरातून ९०० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन करण्यात अजूनही पठाण चित्रपटाला यश मिळाले नाहीये. रिपोर्टनुसार शुक्रवारी पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर 5 कोटीचे कलेक्शन केले.
जगभरातून पठाण चित्रपट १००० कोटींचे कलेक्शन करेल अशी अपेक्षा होती. मात्र, सध्याचे बाॅक्स आॅफिस कलेक्शनवरून १००० कोटींचे कलेक्शन पठाण करेल ही अपेक्षा फार कमी आहे.
शुक्रवारचे पठाण चित्रपटाचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन पाहता आता पठाण चित्रपटाची क्रेझ कमी झाल्याचे दिसत आहे. पुढील काही दिवस कमाईचा आकडा वाढेल का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.