अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात अडकते. नुकतीच तिने 'लॉक अप' या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने तिच्या मनातली तक्रार बोलून दाखवली.
"मी माझ्या मनासारखं वागू शकत नाही का? मला जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर लोक काय विचार करतील याचा मी विचार का करू? मी जे काही केलंय, त्यावरून मला ट्रोलच केलं गेलंय," असं ती म्हणाली.
"पुरुषांपेक्षा जास्त मला महिलांनीच ट्रोल केलंय. कारण मी 'भारतीय नारी' नाही असं त्याचं म्हणणं आहे. भारतीय संस्कृतीनुसार मी वागत नाही, म्हणून मला एलियनसारखी वागणूक दिली जाते," अशी तक्रार तिने केली.
"पूनम पांडे हे नाव ऐकलं की लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची प्रतिक्रिया असते. मी आयुष्यात काही गोष्टी केल्यामुळे, मला लोकांनी पूर्णपणेच ब्लॅकलिस्ट केलं", अशी खंत पूनमने यावेळी व्यक्त केली.
पूनमने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी लग्नगाठ बांधली. काही महिन्यांपूर्वीच पूनमने सॅमवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते.