प्रियांकासोबत निक जोनासचं खास दिवाळी सेलिब्रेशन, लक्ष्मीपूजनाला नवरा-बायको साथ-साथ!
प्रियांका चोप्रा परदेशात राहते. मात्र ती पूर्ण देसी गर्ल आहे. ती तिथे सर्व भारतीय सण साजरे करते. आता प्रियांकाने दिवाळीच्या मुहूर्तावर निकसोबत लक्ष्मीपूजन केले. हे फोटो प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये निक देखील मोठ्या भक्तिभावाने पूजा करताना दिसत आहे.