देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्रा ही बाॅलिवूडमधील काळे सत्य सांगताना दिसली होती. प्रियांका चोप्रा हिने मोठे खुलासे केले.
नुकताच प्रियांका चोप्रा हिने अजून एक मुलाखत दिलीये, या मुलाखतीमध्ये देखील प्रियांका चोप्रा हिने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. बाॅलिवूडमध्ये अभिनेत्री होण्याचा प्रवास किती जास्त कठिण आहे हे सांगताना प्रियांका चोप्रा ही दिसली.
इतकेच नाही तर प्रियांका चोप्रा हिने स्पष्ट सांगितले की, बाॅलिवूडमध्ये रंगभेद हा मोठ्या प्रमाणात असून जर तुम्हाला अभिनेत्री व्हायचे असेल तर तुमचा रंग हा गोराच असावा लागतो. गोरा रंग म्हणजे सुंदर असे मानले जाते.
प्रियांका चोप्रा हिने सांगितले की, मला हे देखील शिकवले गेले की, कोणत्या प्रकारचे शरीर सुंदर मानले जाते. एक विशिष्ट शरीर रचना ही बाॅलिवूडमध्ये सुंदर मानली जाते.
गेल्या काही दिवसांपासून सतत प्रियांका चोप्रा ही बाॅलिवूडमधील काही गोष्टींवर खुलासा करताना दिसत आहे. प्रियांका चोप्रा हिने केलेल्या आरोपांनंतर अनेकांनी करण जोहर याला टार्गेट करण्यास सुरूवात केली होती.