PHOTO | कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर जोशात सुरु झाले प्रियंका चोप्राचे रेस्टॉरंट ‘सोना’, सोशल मीडियावर शेअर केले फोटो!
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आजकाल चित्रपटांपेक्षा अधिक व्यवसाय वाढवण्यात गुंतली आहे. काही काळापूर्वी प्रियंका चोप्राने तिच्या नवीन रेस्टॉरंटची काही खास छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली होती. अभिनेत्रीचे हे आलिशान रेस्टॉरंट न्यूयॉर्कमध्ये आहे. जे ती पती निक जोनास याच्या सोबतीने चालवते.