प्रियांका चोप्रा तिच्या आगामी 'द ब्लफ' सिनेमाच्या शूटिंगसाठी ऑस्ट्रेलिया येथे आहे. प्रियांका चोप्राने सिनेमाचं शूटिंग सुरू केल्यापासून अभिनेत्री इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत प्रत्येक अपडेट पोहोचवत आहे.
काही दिवसांपूर्वी प्रियांका हिला शुटिंग दरम्यान दुखापत झाली होती. जखमी झाल्याचे फोटो देखील अभिनेत्रीने पोस्ट केले होते. आता देखील अभिनेत्रीच्या हाताला दुखापत झाल्याचा फोटो समोर येत आहे.
पण अभिनेत्रीला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसून मेकअप आर्टिस्ट शॅरॉनने प्रियांकाचा मेकअप केलाय. फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, 'मॅनीक्योरची मला गरज आहे... असं मला वाटत आहे...' #द ब्लफ...
प्रियांकाने व्हिडीओ पोस्ट केलाय त्यामध्ये मेकअप आर्टिस्ट शॅरॉन, प्रियांकाच्या हातावर मेकअप करताना दिसत आहे. सध्या फोटो सोशल मीडियावर अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.
फोटोमध्ये प्रियांकाच्या हातावर दिसणारी जखम खरी नसून मेकअप आहे. प्रियांका हिच्या आगामी 'द ब्लफ' सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत.