प्रियांका-निकच्या बाळाचं अजून बारसं का नाही? आई मधु चोप्रांनी सांगितलं कारण
अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस जानेवारीत आई-वडील झाले. दोघांना सरोगसीने मुलगी झाली आहे. याची माहिती स्वतः प्रियांकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. प्रियांकाने अद्याप बाळाबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. पण आता प्रियांकाची आई मधू चोप्राने तिच्या नातवाबद्दल एक भाष्य केले आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मधु चोप्राने आजी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.