दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रुग्णालयात दाखल झाली आहे. याआधी कोरोनाची लागण झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा ती रुग्णालयात पोहोचली आहे.
ऐश्वर्याने स्वत: रुग्णालयातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती डॉक्टरसोबत पहायला मिळत आहे.
हे फोटो शेअर करत ऐश्वर्याने लिहिलं, "कोविडच्या आधी आणि कोविडनंतरचं आयुष्य. ताप आल्याने रुग्णालयात पुन्हा दाखल झाली. पण जेव्हा तुम्ही एका सुंदर आणि प्रेरणा देणाऱ्या डॉक्टरांना भेटता, तेव्हा फार वाईट वाटत नाही."
काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या ही धनुषसोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित विभक्त होत असल्याचं जाहीर केलं.
ऐश्वर्याने 'मुसाफिर' या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून हे गाणं 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.