Raksha Bandhan 2024: बॉलिवूडच्या या भाऊ-बहिणींमध्ये वाद, एकमेकांचा चेहरा ही बघत नाहीत

| Updated on: Aug 16, 2024 | 8:31 PM

रक्षाबंधनाचा सण सर्वांसाठी खास असतो. कारण या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीसाठी भेटवस्तू घेऊन येतो. हा भाऊ-बहिणीचा दिवस खूप खास असतो. रक्षासूत्र बांधल्याने भाऊ-बहिणीचे नाते अधिक घट्ट होते असे मानले जाते. सर्वसामान्यांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळेच जण रक्षाबंधनाचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. चित्रपट कलाकारही हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. चित्रपटसृष्टीत अनेक भाऊ-बहिणी आहेत जे एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. जसे की, अर्जुन कपूर-अंशुला कपूर, सारा अली खान-इब्राहिम अली खान, रणबीर कपूर- रिद्धिमा सहानी, अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन. पण तुम्हाला माहितीये का की यामध्ये अनेक स्टार्स असे ही आहेत ज्यांचं नातं आज तुटलं आहे. बॉलिवूड स्टार्सची भाऊ-बहीण जोडी जी एकमेकांचा तिरस्कार करू लागली आहेत.

1 / 4
पूजा भट्ट आणि राहुल भट्ट हे भाऊ आणि बहीण आहेत. परंतु बर्याच काळापासून त्यांचे एकमेकांशी चांगले संबंध नाहीत. दोघेही कोणत्या फंक्शनमध्ये एकत्र दिसले नाहीत.

2 / 4
अमिषा पटेल ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अस्मित पटेल हा तिचा भाऊ आहे, पण अमिषा आणि अस्मित यांच्यातील बंध फारसे चांगले नसल्याचं म्हटलं जातं. दोघांमध्ये मोठा वाद झाला, त्यानंतर दोघांचे बोलणे बंद झाले.

3 / 4
सध्या सोनाक्षी सिन्हा आणि लव सिन्हा यांची सर्वाधिक चर्चा होत आहे. सोनाक्षी आणि लव सिन्हा यांचे संबंध चांगले नाहीत. नाराजीमुळे लव सिन्हा आपल्या एकुलत्या एक बहिणीच्या लग्नालाही उपस्थित राहिला नाही.

4 / 4
हृतिक रोशनला एकच बहीण असून तिचे नाव सुनैना रोशन आहे. हृतिक आणि सुनैना यांच्यात मोठे भांडण झाले होते, त्यानंतर दोघांचे बोलणे बंद झाले आहे.