रकुल प्रीत सिंह हिने अत्यंत कमी वेळामध्ये बाॅलिवूडसह साऊथमध्ये ही स्वत: ची एक खास ओळख नक्कीच निर्माण केलीये. रकुल तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते.
रकुल प्रीत सिंहचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. विशेष म्हणजे रकुल प्रीत सिंह ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करते.
गेले वर्ष रकुल प्रीत सिंह हिच्यासाठी काही खास गेले नाहीये. 2023 कडून रकुलला मोठ्या अपेक्षा आहेत. साऊथमध्येही रकुल प्रीत सिंहचा चाहता वर्ग मोठा आहे.
नुकताच रकुल प्रीत सिंह हिने नवीन वर्षामधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रकुलचा एकदम ग्लॅमरस लूक दिसतोय.
रकुलने हे फोटोशूट क्रॉप टॉप आणि बिकिनीमध्ये केले आहे. आता रकुलचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.