रणबीरची बहीण करीना कपूर खानने आलियाला डायमंडचा महागडा नेकलेस दिला. या नेकलेसची किंमत जवळपास 3.1 लाख रुपये इतकी असल्याचं म्हटलं जात आहे.
रणबीर-आलियाला रणवीरने आलिशान बाईक भेट म्हणून दिली आहे. Kawasaki Ninja H2 R ही बाईक त्याने या नवविवाहित जोडप्याला दिली आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोणने Chopard या घडाळ्याचं सेट गिफ्ट म्हणून दिलंय. या घडाळ्याची किंमत ही जवळपास 15 लाख रुपये असल्याचं कळतंय.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांच्यात चांगली मैत्री आहे. सिद्धार्थने आलियाला वर्सासे (Versace) ब्रँडची हँडबॅग गिफ्ट म्हणून दिली आहे. या बॅगची किंमत ही जवळपास 3 लाख रुपये आहे.
आलिया आणि वरुण धवनने अनेकदा एकमेकांसोबत काम केलंय. वरुणने आलियाला गुच्ची (Gucci) या ब्रँडचे हाय हिल्स दिले आहेत. या हाय हिल्सची किंमत जवळपास 4 लाख रुपये इतकी आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्राने आलियाला जवळपास 9 लाख रुपयांचा डायमंड नेकलेस भेट म्हणून दिला आहे. प्रियांका आणि आलिया लवकरच एकत्र चित्रपटात काम करणार आहेत.
रणबीरची आई नीतू कपूर यांनी मुलाला आणि सुनेला 6 बीएचके फ्लॅट दिल्याचं म्हटलं जात आहे. या फ्लॅटची किंमत सुमारे 26 कोटी रुपये इतकी आहे.
अभिनेत्री कतरिना कैफने आलियाने प्लॅटिनम ब्रेसलेट दिलं आहे. या ब्रेसलेटची किंमत सुमारे 14.5 लाख रुपये इतकी असल्याचं कळतंय.
'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी याने रणबीर-आलियाला 1.3 कोटी रुपयांची Audi Q8 ही आलिशान गाडी भेट म्हणून दिली आहे.
अभिनेता अर्जुन कपूर आणि रणबीर हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. अर्जुनने रणबीरला दीड लाख रुपयांचं झिपर जॅकेट भेट म्हणून दिलं आहे.
अनुष्का शर्माने फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाइन केलेला खास ड्रेस आलियासाठी दिला आहे. या ड्रेसची किंमत 1.6 लाख रुपये असल्याचं समजतंय.