तू झूठी मैं मक्कार या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर हा चर्चेत आहे. विशेष म्हणजे 8 मार्च रोजी रणबीर कपूर याचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट रिलीज झालाय.
तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान कामगिरी करण्यास सुरूवात केलीये. या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार करताना रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर दिसले.
नुकताच रणबीर कपूर याने एक मुलाखती दिलीये. यावेळी रणबीर कपूर याला विचारण्यात आले की, कोणत्या बाॅलिवूड अभिनेत्रीसोबत तुला काम करायला आवडले?
तसेच यावेळी रणबीर कपूर म्हणाला की, अनुष्का शर्मा हिच्यासोबत काम करत असताना चित्रपटाच्या सेटवर मजा येते. रणबीर कपूर याने क्रिती सेनॉन हिच्यासोबत काम करण्याची इच्छा का जाहिर केली हे कळले नाहीये.