नुकताच रणबीर कपूर याने आपल्या सुंदर त्वचेचे आणि फिटनेसचे रहस्य चाहत्यांसोबत शेअर केले आहे. जर तुम्हालाही रणबीर कपूर याच्यासारखा फिटनेस आणि सुंदर त्वचा हवी असेल तर त्याच्या खालील टिप्स फाॅलो करा.
रणबीर कपूर हा म्हणाला की, टॅनिंग टाळण्यासाठी मी चेहरा बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवतो. फिटनेससाठी मी योगा करतो. माझी पत्नी आलिया भट्ट ही माझ्या फिटनेसकडे खास लक्ष देते.
रणबीर कपूर हा पुढे म्हणाला की, आलिया कायमच मला योगा करण्यासाठी प्रोत्साहन देते. रणबीर कपूर म्हणाला की, तुम्ही योगा केल्यावर तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या आणि खास ग्लो येतो.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. रणबीर कपूर आणि आलिया यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे. मात्र, राहाची झलक अजूनही त्यांनी दाखवली नाही.