Ranbir Kapoor | रणबीर कपूर याने घेतला मोठा यू टर्न, म्हणाला आपल्या देशापेक्षा काहीही…
बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. रणबीर कपूर हा त्याच्या तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. रणबीर कपूर हा त्याच्या तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. नुकताच चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी रणबीर कपूर हा चंडीगढमध्ये पोहचला होता.
2 / 5
यावेळी रणबीर कपूर याने थेट पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा जाहिरपणे बोलून दाखवली. ज्यानंतर सर्वच स्तरातून रणबीर कपूर याच्यावर सडेतोड टिका करण्यात आली. आता यावर रणबीर कपूर याने यूटर्न घेतल्याचे दिसत आहे.
3 / 5
रणबीर कपूर म्हणाला की, चित्रपट हा चित्रपट आहे...त्याला सीमा नाहीये...कला ही एक कला आहे तिला देखील कोणतीही सीमा नाही...पण आपल्या देशापेक्षा कोणतीही कला मोठी नक्कीच नाहीये.
4 / 5
5 / 5
रणबीर कपूर याने होत असलेल्या टिकेनंतर आता मोठा यूटर्न नक्कीच घेतला. रणबीर कपूर यावेळी असाही म्हणाला की, मी जे काही बोललो त्याचा चुकीचा अर्थ हा घेतला गेला आहे. माझ्यासाठी कायमच देश पहिल्यांदा आहे.