Ratris Khel Chale 3 | ‘आता काळजाचा ठोका चुकणार नाही तर थांबेल…कायमचा…’, ‘शेवंता’च्या पुनरागमनासाठी चाहते उत्सुक!
‘रात्रीस खेळ चाले 3’ साठी प्रेक्षकांना आता फार उत्सुकता ताणून धरावी लागणार नाही. कारण पुढच्याच आठवड्यापासून ही मालिका पुन्हा झी मराठीवर रुजू होत आहे. 16 ऑगस्टपासून नव्या वेळेनुसार सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता या मालिकेचं प्रसारण होणार आहे.
1 / 6
झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale 3) या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांना चांगलेच खिळवून ठेवले आहे. पहिल्या दोन भागांना चाहत्यांकडून कमालीची लोकप्रियता मिळाली होती. मात्र तिसरा सिझन सुरु झाला आणि अल्पावधीत कोरोनामुळे चित्रिकरणालाच ब्रेक लागला. मात्र, आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
2 / 6
‘रात्रीस खेळ चाले 3’ साठी प्रेक्षकांना आता फार उत्सुकता ताणून धरावी लागणार नाही. कारण पुढच्याच आठवड्यापासून ही मालिका पुन्हा झी मराठीवर रुजू होत आहे. 16 ऑगस्टपासून नव्या वेळेनुसार सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता या मालिकेचं प्रसारण होणार आहे.
3 / 6
नुकताच मालिकेचा नवा प्रोमो शेअर करत वाहिनीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इतकेच नाही तर, आता शेवंता घायला नाही तर घातच करणार असे देखील म्हटले आहे. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.
4 / 6
बदललेली वेळ आणि नव्या व्यक्तिरेखांचा भरणा या काही करणांमुळे ‘रात्रीस खेळ चाले 3’ प्रेक्षकांची फारशी पकड घेऊ शकली नव्हती. मात्र, आता कलाकारांसह लेखक, निर्माते आणि दिग्दर्शकही जोरदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
5 / 6
‘अण्णा नाईक’, ‘माई’, ‘शेवंता’, ‘पांडू’ या आपल्या आवडत्या पात्रांची प्रेक्षक वाट बघत आहेत. गेल्याच आठवड्यात पांडूची भूमिका साकारणारा अभिनेता आणि मालिकेचा लेखक प्रल्हाद कुडतरकर याने ‘रात्रीस खेळ चाले 3’ लवकरच सुरु होणार असल्याचं सांगितलं होतं.
6 / 6
कोकणात प्रचंड पाऊस सुरु झाल्यामुळे पावसाचा व्यत्यय आला होता, मात्र अण्णा नाईकांची भूमिका साकारणारे दिग्गज कलाकार माधव अभ्यंकर यांनी फेसबुकवर फोटो शेअर करत शूटिंग पुन्हा सुरु झाल्याचं सांगितलं आहे.