समुद्रात पोज देतांना दिसली रवीना टंडनची मुलगी, लोकं म्हणाले इतकी सुंदर…
अभिनेत्री रवीना टंडन आपल्या मुलांसोबत इटलीमध्ये आहे. तिथे ते सुट्टीचा आनंद घेत आहेत. या दरम्यान तिने अनेक फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
1 / 5
रवीनाची मुलगी राशा हिने व्हेकेशनमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिचा हॉट आणि बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. राशाचे हे फोटो पाहून लोकं तिच्या सौदर्यांचे कौतूक करत आहेत.
2 / 5
या फोटोंमध्ये राशा पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये समुद्र किनाऱ्यावर उभी असलेली दिसत आहे. राशाच्या या किलर लूकमुळे नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही फोटोंमध्ये ती पाण्यात पोहताना आणि मजा घेताना दिसत आहे.
3 / 5
फोटोंमध्ये राशा निसर्गाचा आनंद लुटताना दिसत आहे. ड्रेससोबतच पांढऱ्या रंगाचा चष्मा तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. एका यूजरने कमेंट केली की, 'आता पर्वतांमध्येही असे सौंदर्य नाही.' दुसऱ्या यूजरने कमेंट केली- 'नेहमीप्रमाणेच सुंदर, सुंदर राणी. सुंदर सुंदर राजकुमारी. तिसऱ्या युजरने म्हटले की, 'काय सौंदर्य आहे'.
4 / 5
राशा लवकरच अजय देवगण आणि त्याचा भाचा अमन देवगणसोबत एका चित्रपटात दिसणार आहे. केदारनाथ आणि रॉक ऑन सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
5 / 5
या चित्रपटाबद्दल बोलताना राशाने सांगितले की, तिच्या पहिल्या चित्रपटासाठीचे ऑडिशन इतके चांगले गेले नाही. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. प्रज्ञा कपूर आणि रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची संयुक्त निर्मिती करत आहेत.