बिग बाॅस 16 मधून अर्चना गाैतम हिला खरी ओळख मिळालीये. अर्चना गाैतम ही मुळची मेरठ येथील आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करून अर्चना गाैतम इथंपर्यंत पोहचलीये.
अर्चना गाैतम हिचा बिग बाॅस 16 चा प्रवास एकदम जबरदस्त राहिला आहे. कारण नसताना देखील अर्चना गाैतम अनेकदा घरातील सदस्यांसोबत भांडणे करताना दिसली.
टेलिकॉलिंग कंपनीमध्ये अर्चना गाैतम हिने जाॅब करण्यास सुरूवात केली. इतकेच नाही तर दहा वीस रूपयांसाठी तिने खाली सिलेंडर डिलीवरी करण्यासही सुरूवात केली.
अर्चना गाैतम हिला खरी ओळख बिग बाॅस 16 मधून मिळालीये. एक वेगळा अंदाज बिग बाॅस 16 मध्ये अर्चना गाैतम हिचा बघायला मिळाला.
शिव ठाकरे याचा एका भांडणामध्ये गळा पकडल्यामुळे ती खरी चर्चेत आली होती. त्यानंतर तिला बिग बाॅसच्या घरातून बेघर देखील करण्यात आले होते.