Alia Bhatt प्रमाणे तुम्हीही पुन्हा नेसताय लग्नाची साडी? ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

| Updated on: Oct 18, 2023 | 3:44 PM

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने लग्नाची साडी नेसली होती. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी आलिया भट्ट हिने लग्नाच्या सडीची का निवड केली? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला. तुम्ही देखील दुसऱ्यांदा लग्नाची साडी नेसत असाल तर, काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

1 / 5
आलिया भट्ट हिच्याप्रमाणे तुम्ही देखील पुन्हा लग्नाची साडी नेसणार असाल तर, साडी शिवाय तुम्हाला वेगळा लूक कॅरी करावा लागेल. लग्नात कॅरी केलेला लूक दुसऱ्या कार्यक्रमासाठी करु नका.

2 / 5
आलिया हिने लग्नात हॅवी नेकपीस घातला होता. तर राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीने सुंदर चोकर घातला होता.  आलिया हिने लग्नाच्या साडीवर घातलेली ज्वेलरी फार उठून दिसत होती.

3 / 5
लग्नात आलिया हिने केस मोकळे सोडले होते. तर राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीने बन बांधला होता. तुम्हाला देखील एखाद्या कार्यक्रमात हटके लूक करायचा असेल तर तुम्ही आलिया हिचा लूक कॅरी करु शकता.

4 / 5
दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात लग्नाची साडी का नेसली याचं कारण खुद्द अभिनेत्रीने सांगितलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कारण सांगितलं आहे.

5 / 5
आलिया म्हणाली, ‘एका खास दिवसासाठी खास कपड्यांची गरज असते आणि अनेकदा ते खास कपडे तुमच्याकडे असतात. जे एका दिवसासाठी खास असू शकतात ते अनेकदा देखील खास ठरु शकतात..’ सध्या सर्वत्र आलिया हिच्या पोस्टची चर्चा आहे.