आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी, परखड मतांसाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
रिचाने बोल्ड चेक्ड लेदर ड्रेसमध्ये हा फोटोशूट केला असून, तिच्या फोटोंपेक्षा अधिक कॅप्शनचीच चर्चा होत आहे.
'सुधर जाओ, वरना बॅकड्रॉप बन जाओ', असं कॅप्शन तिने या फोटोशूटला दिलं आहे. वर्तमानपत्रांच्या बॅकड्रॉपवर तिने हे बोल्ड फोटोशूट केलं आहे.
काहींनी रिचाच्या या फोटोशूटचं कौतुक केलं आहे, तर काहींनी तिला उपरोधिक टोला लगावला आहे.
'आपको सुर्खियों मे रहने की आदत है', असा टोला एका नेटकऱ्याने रिचाला लगावला आहे.
सोशल मीडियावर असो किंवा मुलाखतींमध्ये, रिचा अत्यंत बिनधास्तपणे तिची मतं व्यक्त करताना दिसते.