HBD Riteish Deshmukh : रितेश देशमुखचे लहानपणीचे हे फोटो पाहिले का?
रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीतला एक प्रसिद्ध चेहरा.. आज त्याचा 42वा वाढदिवस (Birthday) आहे. त्यानिमित्त त्याच्याविषयी खास माहिती जाणून घेऊया...
1 / 6
रितेशचा जन्म जन्म लातूरमधील बाभळगाव या गावी झाला. माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख व वैशाली देशमुख यांचा तो दुसरा मुलगा..
2 / 6
कमला रहेजा महाविद्यालय, मुंबई या महाविद्यालयातून त्याने आर्किटेक्ट ही पदवी प्राप्त केली. मात्र अभिनयाची आवड असल्याने त्याने चित्रपटात अभिनय करण्यास प्राधान्य दिले.
3 / 6
2003मध्ये प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटाद्वारे जोडी जमलेल्या जेनेलिया डिसुझाला रितेशने आयुष्याचा जोडीदार (पत्नी) म्हणून पसंत केले व 2012मध्ये हिंदू व ख्रिस्चन या दोन्ही रितीरिवाजानुसार विवाहबद्ध झाले.
4 / 6
रितेश आणि जेनेलिया यांना २ मुले असुन रिआन व राहील अशी त्यांची नावे आहेत. रितेश मनोरंजनासह सामाजिक कार्यातही सहभागी होत असतो.
5 / 6
दिलीप देशमुख हे रितेशचे काका आहेत. ते राजकारणात सक्रीय आहेत. त्यांचा एक लहानपणीचा फोटो पोस्ट करण्यात आला. यात आईसह त्याचे काका दिसत आहेत.
6 / 6
आई वैशाली देशमुख यांच्यासह घरात जेनेलिया आणि रितेश देशमुख राहतात. रितेश देशमुख हे युवक बिरादरी (भारत) या राष्ट्रीय पातळीवरील युवा संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. रितेश आणि जेनेलिया यांनी अवयव दान करण्याचा निर्यय घेतला आहे.