Akash Thosar: ‘सैराट’मधला परश्या आता झालाय ‘माचोमॅन’; आकाशच्या मेकओव्हरवर तरुणी घायाळ
सोशल मीडियावर आकाशचा (Akash Thosar) मोठा चाहतावर्ग असून त्याच्या फोटो, व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो. 'सैराट'नंतर आकाशचा मेकओव्हर कसा झाला, ते फोटोच्या माध्यमातून पहा..
1 / 11
'सैराट' या पहिल्यावहिल्या चित्रपटातून आपली छाप सोडणारा अभिनेता आकाश ठोसरचा आज वाढदिवस. आकाशचा जन्म २४ फेब्रुवारी १९९३ रोजी झाला.
2 / 11
आकाश मूळचा पुण्यातील औंध इथं राहणारा आहे. औंधमधील एसएसव्हीएम शाळेतून त्याने शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने पुणे विद्यापिठातून पदवीचं शिक्षण घेतलं.
3 / 11
शिक्षण घेत असताना आकाशने काही नाटकांमध्येही भाग घेतला. त्याला कुस्तीचीही आवड आहे.
4 / 11
नागराज मंजुळे यांनी सैराटसाठी आधी सहकलाकाराच्या भूमिकेसाठी आकाशचं ऑडिशन घेतलं होतं. मात्र त्याच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांनी त्याला मुख्य भूमिकेसाठी घेतलं.
5 / 11
सैराट या चित्रपटानंतर आकाशचं पूर्ण मेकओव्हर झाल्याचं पहायला मिळालं.
6 / 11
त्याने वेब शो आणि इतरही चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली.
7 / 11
१९६२- द वॉर इन द हिल्स या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने शरीरयष्टीवर विशेष मेहनत घेतली.
8 / 11
आकाश सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा तो फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतो.
9 / 11
रिंकू राजगुरूसोबत शेअर केलेल्या फोटोंना नेटकऱ्यांकडून सर्वाधिक लाइक्स मिळाले होते.
10 / 11
आकाश लवकरच 'झुंड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
11 / 11
'झुंड' या चित्रपटातील आकाशचा लूक