बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान खान याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नुकताच सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील नवे गाणे आज रिलीज करण्यात आले आहे. बथुकम्मा हे गाणे रिलीज झाले असून चाहत्यांना हे गाणे प्रचंड आवडले आहे.
विशेष म्हणजे सलमान खान याच्या या गाण्यामध्ये बिग बाॅस फेम शहनाज गिल आणि श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारीची देखील झलक बघायला मिळत आहे. सलमान खान याच्या चित्रपटातील काही गाणे यापूर्वी रिलीज झाले आहेत.
विशेष म्हणजे बथुकम्मा या गाण्यात सलमान खान याला साऊथ इंडियन लूक दिसत आहे. या गाण्यात सलमान खान याने लुंगी घातलेली दिसत आहे. जवळपास सर्वांचाच लूक या गाण्यात साऊथ इंडियन आहे.
काही दिवसांपूर्वी किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील बिली बिली हे गाणे रिलीज झाले होते. सलमान खान याच्या चाहत्याला त्याचा हा लूक प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.