घटस्फोटानंतर पहिल्यांदाच एका ठिकाणी दिसले सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य! जाणून घ्या पुढे काय झाले…
समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने यावर्षी त्यांच्या लाखो चाहत्यांची मने मोडली. दोघेही साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांनीही त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.
1 / 5
समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने यावर्षी त्यांच्या लाखो चाहत्यांची मने मोडली. दोघेही साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांनीही त्यांच्या विभक्त झाल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. मात्र, वेगळे होण्याचे कारण कोणीही दिले नव्हते.
2 / 5
आता अशा बातम्या येत आहेत की, वेगळे झाल्यानंतर दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्पॉट झाले होते. वास्तविक, दोघेही नुकतेच ‘रामा नायडू’ स्टुडिओमध्ये काम करत होते. नागा त्याच्या ‘बंगाराजू’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. तर समंथा तिथेच ‘यशोदा’ चित्रपटाचे शूटिंग करत होती. एकाच ठिकाणी काम करूनही दोघेही एकमेकांशी बोलत देखील नव्हते.
3 / 5
यानंतर दोघेही एकमेकांना न भेटता आपापल्या गाडीत बसले. ही बातमी आल्यापासून असे दिसतेय की, समंथा आणि नागा यांच्यात आता चांगला संवाद देखील नाही.
4 / 5
समंथा आणि नागा यांनी 2 ऑक्टोबरला जाहीर केले होते की, ते दोघेही आता पती-पत्नी म्हणून एकत्र नाहीत. दोघांच्या लग्नाला 4 वर्षे झाली होती. दोघांनी लिहिले की, आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही एक दशकाहून अधिक काळ आमची मैत्री होती. आम्हा दोघांमध्ये एक खास बंध निर्माण झाला. पण, आम्ही पती-पत्नी म्हणून एकत्र राहू शकत नाही.
5 / 5
नागापासून वेगळे झाल्यानंतर आता समंथा तिच्या व्यावसायिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे. यासोबतच ती मैत्रिणींसोबत सुट्टीवरही जाते.