Sandeep Pathak : महाराष्ट्राची लालपरी आणि ‘ती’ सुटकेस, ‘मला मुंबईत येऊन 21 वर्ष पूर्ण होत आहेत’ म्हणत संदीप पाठकला आठवले स्ट्रगलचे दिवस
हे फोटो प्रत्येक सर्वसाधारण व्यक्तीच्या मनाला भिडणारे आहेत. एवढंच नाही तर संदीपनं सांभाळून घेवलेल्या या आठवणींचं ही सोशल मीडियावर कौतुक होत आहे. (Sandeep Pathak’s amazing photoshoot with bus, See Pictures)
1 / 6
मराठी मनोरंजन विश्वाचा लाडका विनोदी अभिनेता संदीप पाठक सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याचे भन्नाट व्हिडीओ आणि फोटोंमुळे तो नेहमी चर्चेत देखील असतो.
2 / 6
आता लालपरीसोबत अर्थात राज्यातील एसटीसोबत त्यानं काही फोटो क्लिक केले आहेत. फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमुळे आता तो पुन्हा चर्चेत आला आहे.
3 / 6
आपण सगळेच अनेक स्वप्न मनाशी धरत मोठ्या शहरात प्रवेश करतो. अनेक कलाकारांनीही शुन्यापासून सुरुवात करत आज आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. याच यादीत अभिनेता संदीप पाठकचाही समावेश आहे.
4 / 6
याच प्रवासावर भाष्य करणारे हे फोटो आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये संदीपनं लिहिलं, ‘१४ ॲागस्ट ह्या दिवशी मला मुंबईत येऊन २१ वर्ष पूर्ण होत आहेत. २१ वर्षापूर्वी ज्या यश्टी ने मी माजलगाव हून मुंबईला आलो ती ही यश्टी, जी सुटकेस मी घेऊन आलो ती मी अजून जपून ठेवली आहे.आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि ठरवल की त्या रूपात फोटो काढूया #nostalgia’ आता हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
5 / 6
एवढंच नाही तर मंत्री सतेज पाटील यांनी सुद्धा संदीप पाठकच्या या फोटोशूटचं कौतुक केलं आहे. त्यांनी संदीपचं ट्विट रिट्विट करत लिहिलं, ‘महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असणाऱ्या लालपरीने आजअखेर लाखो प्रवाशांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचवले आहे. संदीपजी 'माजलगाव ते मुंबई' या तुमच्या यशाच्या प्रवासातील लालपरीबद्दलची तुमची आठवण अविस्मरणीय आहे.’.
6 / 6
हे फोटो खरच प्रत्येक सर्वसाधारण व्यक्तीच्या मनाला भिडणारे आहेत. एवढंच नाही तर संदीपनं सांभाळून घेवलेल्या या आठवणींचं ही सोशल मीडियावर कौतुक होत आहे.