अभिनेत्री सारा अली खान हिने राहात्या घरी गणरायाचं स्वागत केलं आहे. दरवर्षी प्रमाणे सारा हिने यंदाच्या वर्षी देखील गणरायाची स्थापना केली आहे.
सोशल मीडियावर गणपतीसोबत फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सर्वत्र साराच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'गणेशोत्सवाच्या शुभेच्छा... बाप्पा सर्वांना आनंद आणि शांती देवो...' असं लिहिलं आहे.
सारा कायम देवदर्शनासाठी देखील जात असते. सारा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.