अभिनेता आयुष्मान खुराना याच्या अॅन अॅक्शन हिरो हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाकडून कमाईच्या खूप जास्त अपेक्षा होत्या. परंतू चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाल करू शकला नाहीये.
अॅन अॅक्शन हिरो चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त होईल, असे अनेकांना वाटले होते. परंतू प्रत्यक्षात तसे अजिबातच झाले नाहीये. इतकेच नाही तर दुसरा दिवसही चित्रपटासाठी काही खास ठरला नाहीये.
विकेंडचा फायदा देखील चित्रपटाला झाला नसल्याचे बाॅक्स आॅफिस कलेक्शनवरून दिसत आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर 2.16 कोटीची कमाई केलीये.
दृश्यम 2 हा चित्रपट सध्या बाॅक्स आॅफिसवर धमाका करतोय. भेडिया हा चित्रपट देखील सुरू आहे. परंतू दृश्यम 2 चा जलवा अजूनही बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळतोय.
आयुष्मान खुराना या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना दिसतोय. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरेल असे अनेकांना वाट होते. परंतू प्रेक्षकांना या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे.