मलायका अरोरा तिच्या आगामी शो 'मूव्हिंग इन विथ मलायका'मध्ये प्रचंड व्यस्त आहे. विशेष म्हणजे मलायकाने तिच्या या खास शोची शूटिंगही सुरू केलीये.
मलायका तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. मलायकाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील आहे.
मलायका आपल्या चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते. मलायकाच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहते कायमच उत्सुक असतात.
नुकताच डिज्नी+ हॉटस्टारने मलायकाच्या घराचे काही खास फोटो शेअर केले आहेत, हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना देखील दिसत आहेत.
मलायकाचे घर एकदम भारी दिसत असून मलायकाच्या नावाची नेमप्लेट देखील या फोटोमध्ये दिसत आहे. मलायकाचे मुंबईमध्ये आलिशान असे घर आहे.