बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांचं दुबई कनेक्शन हे चाहत्यांना ठाऊकच आहे. दुबईतल्या बुर्ज खलिफावर अनेक बॉलिवूड कलाकारांचे पोस्टर झळकतात. तर दुबईत बॉलिवूड चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळतो.
आता बॉलिवूडमधल्या काही नामांकित कलाकारांनी दुबईवारी केली आहे. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांचा समावेश आहे.
या कलाकारांनी सौदी अरबच्या सांस्कृतिक मंत्री बद्र बिन फरहान अलसऊद यांची भेट घेतली. या भेटीदरम्याने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलिवूडचे तीन खान आणि अक्षय कुमार यांच्या भेटीचे फोटो बिन फरहान यांनीसुद्धा इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
बॉलिवूडच्या सुपरस्टार्सची भेट घेतली. या भेटीदरम्यान चित्रपटांच्या सुंदर विश्वाबद्दल अत्यंत माहितीपूर्ण संवाद साधता आला, असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलं आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुखने त्याच्या मन्नत या बंगल्या सौदी अरेबियाच्या रेड सी फिल्म फेस्टिव्हलच्या अध्यक्षांची भेट घेतली होती.
बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारांनी सौदी अरबच्या सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेण्यामागचं नेमकं कारण काय, असा प्रश्न यावेळी नेटकऱ्यांनी विचारला आहे. या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.