Shah Rukh Khan | अनेक व्यवसाय सांभाळते गौरी खान, एकटीच्या कमाईचा आकडा थक्क करणारा
मुंबई : 19 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान फक्त इंटिरिअर डिझायनरच नाही तर, 'या' व्यवसायांची मालकीण... करते कोट्यवधींचा उद्योग.. तिच्या एकटीच्या कमाईचा आकडा थक्क करणारा... सध्या सर्वत्र किंग खान याच्या पत्नीच्या प्रोफेशनल आयुष्याची चर्चा...
1 / 5
अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान फक्त इंटिरिअर डिझायनर तर आहे, पण अन्य व्यवसायांची जबाबदारी देखील गौरी खान हिच्या खांद्यावर आहे. गौरी तिच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई करते.
2 / 5
गौरी खान हिने २००२ मध्ये निर्माती म्हणून रेड चिलीज एंटरटेनमेंट कंपनीची सुरुवात केली. गौरी खान आणि शाहरुख खान यांनी मिळून आतापर्यंत २० पेक्षा अधिक सिनेमांची निर्मिती केली आहे. गौरी प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर देखील आहे.
3 / 5
जुहूमध्ये किंग खान याच्या पत्नीचं 'गौरी खान डिझाईन्स स्टुडिओ' आहे. गौरी खान हिने आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या घराचं इंटिरिअर डिझाईन केलं आहे. गौरी हिने उद्योजक मुकेश अंबानी यांच्यापासून दिग्दर्शक करण जोहर यांच्या घराचं इंटिरिअर डिझाईन केलं आहे.
4 / 5
शाहरुख खान याची पत्नी इंटिरिअर डिझायनरच नाही तर, मुंबईतील एका हॉटेलची मालकीण देखील आहे. गौरी खान हिच्या हॉटेलचं नाव 'अर्थ' असं आहे. हॉटेल स्वतः गौरी खान हिने डिझाईन केलं आहे.
5 / 5
गौरी तिच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई करते. रिपोर्टनुसार, गौरी हिच्याकडे जवळपास १ हजार ७२५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. गौरी अभिनेत्री नसली तरी, चाहत्यांमध्ये कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील गौरी हिच्या चाहत्यांची फार मोठी संख्या आहे.