आर्चीज या चित्रपटामधून शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटामुळे सुहाना खान सध्या चर्चेमध्ये आहे.
सुहाना नुकताच आर्चीज चित्रपटाच्या रैप-अप पार्टीमध्ये पोहचली होती. यावेळी सुहानाचा लूक एकदम बोल्ड दिसत होता.
सुहानाने या पार्टीमध्ये लाल रंगाचा ड्रेस घातला होता. आता सोशल मीडियावर सुहानाचे या पार्टीला जातानाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
आर्चीज या चित्रपटामधून फक्त सुहाना खानच नाहीतर खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातून अगस्त्य नंदा देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करतोय.
आता या पार्टीमधील फोटो व्हायरल होत आहेत. सुहाना खान हिचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.