सैफ अली खान याने तेरा वर्षांचा संसार मोडत अमृता सिंह हिच्यासोबत घटस्फोट घेत करीना कपूर हिच्यासोबत लग्न केले. सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या लग्नाला आता जवळपास 10 वर्ष आहेत.
अमृता सिंहसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खान याने मोठा दावा केला होता. या वादामध्ये शाहरुख खान याला देखील आणले गेले. घटस्फोट घेतल्यानंतर दर महिन्याला सैफ अली खान हा अमृता सिंहला 1 लाख रूपये देत होता.
एका मुलाखतीमध्ये सैफ अली खान याने म्हटले होते की, माझ्याकडे शाहरुख खान याच्या ऐवढे पैसे नक्कीच नाहीत. मला अमृता सिंह हिला तब्बल 5 कोटी द्यायचे आहेत. मी आतापर्यंत 2.5 कोटी दिले आहेत.
उरलेले पैसेही देण्याची माझी इच्छा आहे. पण माझी कमाई ही शाहरुख खान याच्या ऐवढी नाहीये. अमृता सिंहसोबतच्या वादामध्ये सैफ अली खान याने शाहरुख खान याला ओढल्याने अनेकांना धक्का बसला होता
एका मुलाखतीमध्ये सैफ अली खान याने अमृता सिंहवर मोठा आरोप करत म्हटले होते की, मला अमृता ही सारा आणि इब्राहिम यांना भेटू देत नाहीये. सारा अली खान हिने 2018 मध्ये बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे