Adhyayan Suman | शेखर सुमन याच्या लेकाने बाॅलिवूडवर केला अत्यंत गंभीर आरोप, अखेर अध्ययन याने सोडले माैन

| Updated on: Apr 11, 2023 | 6:02 PM

प्रियांका चोप्रा हिच्यानंतर शेखर सुमन यांनी काही गंभीर आरोप हे बाॅलिवूडवर लावले होते. आता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन यानेही मोठा खुलासा केलाय. गेल्या काही दिवसांपासून सतत बाॅलिवूडवर आरोप केले जात आहेत, अध्ययन याने केलेले आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

1 / 5
शेखर सुमन आणि त्यांचा मुलगा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडवर गंभीर आरोप केल्यानंतर शेखर सुमन यांनीही बाॅलिवूडमधील काही सत्य सांगितले, ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

2 / 5
शेखर सुमन यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा अध्ययन सुमन यानेही मोठा खुलासा केलाय. अध्ययन सुमन याचे बोलणे ऐकून चाहते हैराण झाले आहेत. आपल्याला चित्रपटांमधून बाहेरचा रस्ता नेमका का दाखवण्यात आला, हे सांगताना अध्ययन सुमन दिसला.

3 / 5
हाल ए दिल या चित्रपटाच्या माध्यमातून अध्ययन सुमन याने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्यानंतर तो फार काही बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये दिसला नाही. आता याचेच कारण थेट अध्ययन सुमन याने सांगितले आहे.

4 / 5
थेट अध्ययन सुमन म्हणाला की, माझे वडील शेखर सुमन यांनी त्यांच्या चॅट शो मूव्हर्स अँड शेकर्समध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, ज्यामुळे लोकांना खूप वाईट वाटले. मात्र, तो शो पूर्णपणे  स्क्रिप्टड होता. तरीही लोकांना इतके जास्त वाईट वाटले की, त्यांनी मला चित्रपटांमधून काढून टाकले.

5 / 5
माझ्या वडिलांनी त्याशोमध्ये कोणावरही व्यक्तीगत टिका कधीच केली नव्हती. ते फक्त आणि फक्त त्यांचे काम करत होते. मात्र, लोकांनी पर्सनली घेतले आणि त्याचा बदला शेखर सुमन यांचा मुलगा म्हणजेच माझ्यावर घेतला.