श्वेता तिवारी हिच्या लाल साडीत दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. नुकताच श्वेता 'इंडियन पोलिस फोर्स' वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. पण आता अभिनेत्री तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे.
1 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाची साडी नेसली आहे. लाल रंगाच्या साडीच श्वेता हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
2 / 5
वयाच्या 43 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. श्वेता कायम तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. सध्या सर्वत्र श्वेता हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.
3 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारीने अनेक बॉलिवूड सिनेमांध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.
4 / 5
‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारी हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.
5 / 5
श्वेता तिवारी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.