‘कोण म्हणत ही दोन मुलांची आई…’, Shweta Tiwari हिच्या ग्लॅमरस अदा, फोटो व्हायरल
अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिचं सौदर्य दिवसागणिक वाढत आहे. वयाच्या 42 व्या वर्षी श्वेता प्रचंड ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर देखील श्वेताचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
1 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारी हिने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये देखील महत्त्वाची भूमिका साकारली. हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.
2 / 5
गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर असलेली श्वेता सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
3 / 5
आता देखील श्वेता तिवारी हिने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये श्वेता हिने लेहेंगा घातला आहे. तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत...
4 / 5
अभिनेत्रीचं सौंदर्य पाहिल्यानंतर चाहत्यांनी कमेंटमध्ये, 'कोण म्हणत ही दोन मुलांची आई आहे...' असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्वेता तिवारी हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
5 / 5
श्वेता तिवारी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. अभिनेत्री दोन मुलांची आई आहे. श्वेताची मोठी मुलगी पलक तिवारी हिने अभिनेता सलमान खान स्टारर 'किसी की भाई किसी जान' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.