प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. मात्र, आता आईसोबत श्वेताची मुलगी पलक तिवारीही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत.
अत्यंत कमी वयामध्ये श्वेताच्या मुलीला बाॅलिवूड चित्रपटांच्या आॅफर मिळत आहेत. यापूर्वी एका चित्रपटात पलकने काम केले आहे. बाॅलिवूडमध्ये मुलीचे लवकर पदार्पण व्हावे, यासाठी श्वेता तिवारी खूप मेहनत घेतली होती.
पलक तिच्या लूक आणि ग्लॅमरसमुळे चर्चेत असते. अगदी लहान वयातच पलकला मोठे चित्रपट ऑफर होत असल्याची एक चर्चा सुरू आहे.
एक अशी चर्चा सुरू आहे की, सलमान खानच्या एका मोठ्या चित्रपटात श्वेता तिवारीची मुलगी पलक दिसणार असून या चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत आहे.
सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटात ती दिसणार आहे. सोबतच तिला बाॅलिवूडच्या अनेक चित्रपटांच्या आॅफर आल्या आहेत.