सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे ७ फेब्रुवारीला लग्नबंधणात अडकले आहे. राजस्थानमध्ये यांचा शाही विवाहसोहळा पार पडलाय. अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांनी सात फेरे घेतले.
गेल्या काही वर्षांपासून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे एकमेकांना डेट करत होते. चाहते यांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून वाट पाहात होते. शेवटी हे लग्नबंधणात अडकले आहेत.
राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या शाही विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत खासगी पध्दतीने हा विवाहसोहळा पार पडलाय.
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नानंतर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. कियाराने लग्नातील फोटो शेअर केल्यानंतर आलिया भट्टने फोटो शेअर करत यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.
एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्ट हिच्या पोस्टवर सिद्धार्थ मल्होत्रा याने रिप्लाय करत तिचे आभार मानले आहेत. कियारा अडवाणी हिने देखील आलियाचे आभार मानले आहेत.