सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे दोघे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. शेवटी कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे ७ फेब्रुवारीला लग्नबंधणात अडकले आहेत.
अत्यंत शाही पध्दतीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा विवाहसोहळा पार पडलाय. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेस यांनी सात फेरे घेतले.
कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा विवाहसोहळा अत्यंत खासगी पध्दतीने पार पडला. या विवाहसोहळ्यात नो फोन पाॅलिशी सर्वांनाच फाॅलो करावी लागली आहे.
विशेष बाब म्हणजे फक्त कियारा हिनेच मेहंदीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा याचे नाव लिहिले नसून सिद्धार्थ मल्होत्रा याने कियारा अडवाणीच्या नावाची मेहंदी आपल्या हातावर काढली.
लग्नानंतर कियारा अडवाणी हिने आपल्या चाहत्यांसाठी काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत होते. आता कियारा आणि सिद्धार्थ हे दोघे मुंबईमध्ये दाखल झाले आहे.