मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतेय. सध्या सोनाली मालदीवची सफर करतेय.
नुकतंच सोनालीचा पती कुणाल बेनोडेकरचा वाढदिवस पार पडला याच सेलिब्रेशनसाठी सोनाली आणि कुणाल मालदीवला पोहोचले आहेत. त्यामुळे आता सोनाली मालदीवमधून तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
एवढंच नाही तर सोनालीनं चाहत्यांसाठी एक इन्स्टाग्राम लाईव्हसुद्धा केलं होतं. ज्यात तिनं चाहत्यांना मालदीवची झलक दाखवली.
वेगवेगळ्या स्टाईलमध्ये सोनाली तिचे फोटो शेअर करत आहे. त्यामुळे तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.
कुणाल आणि सोनालीच्या जोडीला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. दोघांचे फोटो चाहत्यांना कपल गोल्स देत आहेत. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.
मराठी मनोरंजन विश्वात ‘अप्सरा’ म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं 18 मे 2020 अर्थात स्वतःच्या वाढदिवशी चाहत्यांना एक आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. सोनाली आणि कुणालचा दुबईमध्ये विवाहसोहळा पार पडला होता.