बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सोनम कपूर नुकतंच लंडनहून मुंबईला परतली होती, त्यानंतर या अभिनेत्रीला आज पुन्हा मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री गर्भवती असल्याची चर्चा आहे. मात्र तिनं नुकतंच एक पोस्ट शेअर केली आणि सांगितलं की ती गर्भवती नाही.
सोनम कपूरला आज मुंबई विमानतळावर ब्लॅक आउटफिटमध्ये स्पॉट करण्यात आलं.
सोनम कपूरचं फिल्मी करिअर सध्या काही खास चाललेलं नाही. ती अखेर 2019 मध्ये 'द जोया फॅक्टर' चित्रपटात दिसली होती.
सोनम कपूर गेले अनेक महिने लंडनमध्ये पती आनंद आहूजासोबत राहत होती.
सोनम कपूरची ही फॅशन आणि स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.