World Music Day 2021 : ‘सावनी रविंद्र’कडून चाहत्यांना खास भेट!, नवं मल्याळम गाणं रिलीज

| Updated on: Jun 21, 2021 | 4:30 PM

राष्ट्रीय पुरस्कारानंतर ‘सावनी ओरीजनल’ या सीरीजमधील हे तिचं पहिलंच गाणं आहे. या गाण्यात गायिका सावनी सोबत गायक अभय जोधपुरकर देखील आहे. (Special gift to fans from 'Sawani Ravindra' !, New Malayalam song released)

1 / 5
संगीत क्षेत्रात कायम नाविन्यपूर्ण प्रयोग करणारी, सुमधूर गळ्याची गायिका ‘सावनी रविंद्र’ने (Savaniee Ravindrra) जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत ‘वन्निदुमो अझगे’ हे मल्याळम रोमँटिक गाणं रिलीज केलं आहे.

2 / 5
राष्ट्रीय पुरस्कारानंतर ‘सावनी ओरीजनल’ या सीरीजमधील हे तिचं पहिलंच गाणं आहे. या गाण्यात गायिका सावनी सोबत गायक अभय जोधपुरकर देखील आहे.

3 / 5
हे गीत लक्ष्मी हीने लिहीलं आहे. तर, शुभंकर शेंबेकरने गाण्याला संगीत दिलंय. प्रेमाची नवी परिभाषा सांगणाऱ्या या गाण्याचं चित्रीकरण चेन्नईत झालं आहे.

4 / 5
आजवर सावनीने मराठीसह, हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली, कोंकणी अश्या विविध भाषेत अनेक गाणी गायली आहेत. त्यामुळे तिचे भारतातचं नव्हे तर जगभर चाहते आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी या रोमँटिक मल्याळम गाण्याचं भरभरून कौतुक केलं आहे.

5 / 5
गायिका सावनी रविंद्र तिच्या मल्याळम गाण्याविषयी सांगताना म्हणाली की, “संगीताला भाषेचं बंधन नसतं. संगीत हीच एक भाषा आहे असं मी मानते. आणि मी आजवर बहुभाषिक गाणी गायली. दाक्षिणात्य भाषेतील तमिळ, तेलुगू गाणी मी याआधी गायली. तर यापूर्वी मी मल्याळम भाषेत जिंगल्स गायल्या होत्या. मल्याळम भाषा तशी कठीण आहे. त्यामुळे  मी सतत मल्याळम गाणी ऐकायचे. माझा गायक मित्र अभय जोधपुरकर आणि शुभंकर आम्ही तिघांनी हे गाणं करायचं ठरवलं. आम्ही तिघं ही महाराष्ट्रातले आहोत. अभयने याआधी मल्याळममध्ये बरचं काम केलं आहे. त्यामुळे त्याचा अनुभव आमच्या गाठीशी होता.’’