बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'भूत पोलीस' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान यामीची हटके स्टाईल आणि फॅशन सेन्सनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
'भूत पोलीस' चित्रपटाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे यामी खूप आनंदी आहे.
या चित्रपटातील यामीचं काम प्रेक्षकांना खूप आवडलं आहे. यासोबतच यामीच्या फॅशन सेन्सचं कौतुक होतंय. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिने नुकतंच तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. या ड्रेसमध्ये व्ही नेकलाइन आणि बलून स्लिव्हज आहेत. कंबरेपासून ड्रेस घट्ट करून फ्लोअर गाऊन लूक देण्यात आला आहे. जर तुम्हाला हा ड्रेस खरेदी करायचा असेल, तर तुम्ही तो Marmar Halims च्या अधिकृत वेबसाईटवरून 77,995 रुपयांना खरेदी करू शकता.