Sukh Mhnje Nakki Kay Asta : ‘स्टार प्रवाह’ची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ठरली महाराष्ट्राची नंबर वन मालिका, गौरीच्या नव्या लूकला चाहत्यांची पसंती

| Updated on: Oct 07, 2021 | 3:55 PM

गौरीची भूमिका साकारणाऱ्या गिरीजा प्रभूला तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊन तिच्या नव्या लूकची प्रशंसा करत आहेत. ('Sukh Mhnje Nakki Kay Asta' is a Maharashtra's number one serial, Fans are loving Gauri's new look)

1 / 5
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमाने या मालिकेला महाराष्ट्राची नंबर वन मालिका बनवलं आहे. सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं असून गौरीच्या नव्या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे. सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर गौरीला नवा आत्मविश्वास मिळाला.

2 / 5
जयदीपच्या मदतीने तिचं शिक्षणही पूर्ण होत आहे. गौरीच्या मेकओव्हर मागे जयदीपचाही महत्त्वाचा वाटा आहे. गौरीने आपली मतं ठामपणे मांडावीत,  शालिनीची अरेरावी सहन करु नये अशी जयदीपची इच्छा होती. त्यामुळे गौरीचा फक्त लूक नाही तर तिच्या व्यक्तिमत्त्वात देखिल परखडपणा येऊ लागला आहे. गौरीचं हे बदललेलं रुप प्रेक्षकांनाही आवडतं आहे.

3 / 5
गौरीची भूमिका साकारणाऱ्या गिरीजा प्रभूला तिचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया देऊन तिच्या नव्या लूकची प्रशंसा करत आहेत.

4 / 5
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचे पुढील भाग देखिल मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच माईंनी शालिनीला घराबाहेर काढलं. या अपमानाचा बदला शालिनी घेणार यात शंका नाही.

5 / 5
शिर्केपाटील कुटुंबावरच्या या संकटाचा सामना गौरी कसा करणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल. त्यासाठी पाहायला विसरु नका सुख म्हणजे नक्की काय असतं सोमवार ते शुक्रवार रात्री 9.30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.