Sumbul Touqeer | सुंबुल तौकीर हिने मुंबईमध्ये खरेदी केले आलिशान घर, अभिनेत्रीने केली मोठी घोषणा
सुंबुल तौकीर ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. इमली मालिकेतून सुंबुल तौकीर हिला खरी ओळख मिळालीये. विशेष म्हणजे सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सुंबुल तौकीर हिची बघायला मिळते. सुंबुल तौकीर ही बिग बाॅस 16 मध्येही सहभागी झाली होती.
1 / 5
इमली अर्थात आपल्या सर्वांची आवडती सुंबुल तौकीर ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. सुंबुल तौकीर ही बिग बॉस 16 मध्ये सहभागी झाली होती. विशेष म्हणजे बिग बॉस 16 मधील सर्वाधिक मानधन घेणारी सुंबुल तौकीर हिच होती, अशी चर्चा आहे.
2 / 5
बिग बॉस 16 चा फिनाले होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र, असे असताना देखील बिग बॉस 16 तील स्पर्धेक हे सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे याने खास पार्टीचे आयोजन केले होते, या पार्टीमध्ये सुंबुल तौकीर धमाल करताना दिसली.
3 / 5
बिग बॉस 16 मधून बाहेर पडल्यानंतर सुंबुल तौकीर हिने मुंबईमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे. विशेष म्हणजे तिने लगेचच इंटीरिअर देखील करून घेतले. सुंबुल तौकीर हिच्या चाहत्यांना लवकरच तिच्या या घराची झलक आगामी व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे.
4 / 5
सुंबुल तौकीर हिचे हे घर अत्यंत आलिशान असून घरामध्ये सुंदर आर्टिस्टिक वस्तू, पेंटिंग्स आणि सुंदर असे इंटीरिअर करण्यात आल्याची चर्चा आहे. चाहते देखील सुंबुल तौकीर हिच्या घराची एक झलक पाहण्यास आतुर दिसत आहेत.
5 / 5
सुंबुल तौकीर हिच्या येणाऱ्या भागामध्ये तिचे पूर्णघर चाहत्यांना दाखवणार आहे. सुंबुल तौकीर ही बिग बाॅस 16 मध्ये असताना मंडलीची सदस्य होती. अनेकदा सुंबुल तौकीर हिला घरात टार्गेट केले जात होते.