आज देशभरात कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. भाविक जन्माष्टमीचा सण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने साजरा करत आहेत. हा पवित्र सण 30 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज देशातच नव्हे तर परदेशातही साजरा केला जात आहे. प्रत्येक भक्त वेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाची पूजा करतो.
असे अनेक तारे आहेत ज्यांनी पडद्यावर भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारली आहे. या कलकारांनी भूमिका साकारताना प्रत्येकाला देवाच्या महानतेची ओळख प्रेक्षकांना करून दिली आहे. श्री कृष्णाचे पात्र पडद्यावर अनेक कलाकारांनी जिवंत केलं आहे. या कलाकारांमधील एक आहे अभिनेता स्वप्नील जोशी.
अभिनेता स्वप्नील जोशीनं अनेक मालिकांमध्ये श्री कृष्णाची भूमिका साकारली. त्यानं साकारलेली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
आता जन्माष्टमीच्या निमित्तानं स्वप्नील जोशीन काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये तो बाल कृष्णाच्या भूमिकेत दिसतोय.
स्वप्नीलचे हे फोटो चाहत्यांच्या आठवणी ताज्या करत आहेत. ‘राधे राधे’ असं कॅप्शन देत त्यानं हे फोटो शेअर केले आहेत.