स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या हळदीच्या कार्यक्रमामधील खास फोटो व्हायरल, पाहा अभिनेत्रीचा लूक
स्वरा भास्कर हिने फहाद अहमद यांच्यासोबत कोर्टात लग्न केले. स्वरा हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत काही दिवसांपूर्वी याची माहिती आपल्या चाहत्यासोबत शेअर केली होती.
1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने सपा नेता फहाद अहमद याच्यासोबत कोर्ट मॅरेज करून सर्वांनाच मोठा धक्का दिला. यावेळी स्वरा भास्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील आली होती. अनेकांनी स्वराला टार्गेट करण्यास सुरूवात केली.
2 / 5
आता स्वरा भास्कर हिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. नुकताच स्वरा आणि फहाद यांच्या हळदीचा कार्यक्रम पार पडलाय. स्वरा भास्कर हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.
3 / 5
स्वरा भास्कर हिने शेअर केलेले फोटो तिच्या हळदीच्या कार्यक्रमातील आहेत. या फोटोमध्ये स्वरा आणि फहाद हे दिसत आहेत. आता स्वराचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.
4 / 5
अनेकांनी स्वरा भास्कर हिच्या या फोटोंवर कमेंट करण्यास सुरूवात केल्या आहेत. चाहत्यांनी लग्नासाठी स्वरा भास्कर हिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. 12 तारखेपासून स्वरा भास्कर हिच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरूवात झालीय.
5 / 5
फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्यापासून स्वरा भास्कर ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अनेकांनी तिने फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्यानंतर नाराजी जाहिर केली होती.