गेल्या काही दिवसांपासून स्वरा भास्कर तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. स्वरा भास्कर हिने समाजवादी पक्षाच्या नेत्यासोबत लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. लग्नानंतर काही दिवस स्वरा भास्कर ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील होती.
6 जानेवारीलाच स्वरा भास्कर हिने कोर्ट मॅरेज केले. मात्र, काही दिवस लग्नाची गोष्ट सर्वांपासून लपवून स्वराने ठेवली. आता परत एकदा स्वरा भास्कर ही फहाद अहमद याच्यासोबत हिंदू रितीरिवाजाने लग्न करणार आहे.
आता स्वरा भास्कर हिच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. 12 मार्चपासून लग्नाचे कार्यक्रम सुरू होतील. कर्नाटकमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच स्वरा भास्कर हिच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली.
फहाद अहमद याच्यासोबत लग्न केल्याचे जाहिर करताच स्वरा भास्कर हिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. मात्र, यावेळी स्वरा भास्कर हिने देखील ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले.
इंस्टा स्टोरीला आता स्वरा भास्कर हिने एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये स्वरा हिने चेहऱ्याला फेसपॅक लावल्याचे दिसत असून लग्नाच्या तयारीमध्ये स्वरा आता व्यस्त झालीये.