तारक मेहतामध्ये दयाबेन कधी परतणार? अखेर निर्मात्याने सोडले माैन, म्हणाले
आता दयाबेनच्या पुनरागमनावर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या निर्मात्याने मोठे भाष्य केले आहे. गेल्या काही वर्षांपासून दयाबेन हिने मालिकेला रामराम केलाय. चाहते दयाबेनच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
1 / 5
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत जवळपास सर्वांनाच ही मालिका प्रचंड आवडते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांनी या मालिकेला सोडचिठ्ठी दिलीये.
2 / 5
जेठालालची पत्नी अर्थात दयाबेन (दिशा वकानी) ही गेल्या काही दिवसांपासून मालिकेपासून दूर आहे. चाहते सतत दयाबेनच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. दयाबेन कधी मालिकेच पुनरागमन करणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय.
3 / 5
आता दयाबेनच्या पुनरागमनावर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या निर्मात्याने मोठे भाष्य केले आहे. असित कुमार मोदी म्हणाले की, दयाबेन मालिकेत कधी परतणार या प्रश्नाला उत्तरे देऊन मी आता थकलो आहे.
4 / 5
पुढे असित कुमार मोदी म्हणाले, प्रेक्षकांकडून प्रेम मिळणे हे काम सोपे नाहीये. हे मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांनी आम्हाला खूप प्रेम दिले आहे, त्यामुळे आम्हाला मेहनत करावी लागणार आहे. दिशा वकानीची जागा कोणाला घेणे अजिबात सोपे नाहीये. यासाठी खूप जास्त मेहनत लागले.
5 / 5
मला या शोमध्ये मूळ दयाबेन म्हणजेच दिशा वकानीला परत आणायचे आहे. दिशा माझ्या बहिणीसारखी आहे. तिला सध्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. जर तिला परत यायचे नसेल तर नक्कीच तिला जबरदस्ती करू शकत नाही. दिशा वकानी हिला दोन मुले झाले आहेत.