Virat Kohli: ‘त्यानंतर विराटला कधीच भेटली नाही…’, क्रिकेटरच्या एक्स-गर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य!
Virat Kohli love life: भारतीय क्रिकेट संघाचा दमदार क्रिकेटपटू विराट कोहली फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. विराट आता पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
1 / 5
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्नाआधी विराटचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं.
2 / 5
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्यासोबतही विराट याच्यानावाची चर्चा रंगली होती. एक जाहिरातीच्या शुटिंगनंतर विराट - तमन्ना यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. यावर अभिनेत्रीने मोठा खुलासा देखील केला.
3 / 5
एका मुलाखतीत तमन्ना म्हणाली होती, 'लोकांना काहीही माहिती नाही..., त्या जाहिरातीच्या वेळी आम्ही मोजून 4 वेळा बोललो. त्यानंतर मी कधी विराट कोहलीला भेटली नाही आणि आमचं कधी बोलणं झालं नाही...'
4 / 5
असं म्हणत अभिनेत्रीने विराट कोहली याच्यासोबत रंगणाऱ्या रिलेशनशिपच्या चर्चांना पूर्णविराम लावला... आता अभिनेत्री देखील खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
5 / 5
तमन्ना अभिनेता विजय वर्मा याला डेट करत आहे. दोघांनी सर्वांसमोर त्यांच्या नात्याचा स्वीकार देखील केला. आता चाहते तमन्ना आणि विजय यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.