Teacher’s Day Special : मुलांच्या आयुष्याला कलाटणी देणारे हे ‘5’ बॉलिवूड चित्रपट माहीत आहे का?
दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. या विशेष दिवशी बॉलिवूडचे हे काही चित्रपट तुम्ही बघायलाच हवे. (Teacher's Day Special: Do you know this '5' Bollywood movie that changes the lives of kids?)
1 / 6
शिक्षकाशिवाय आपण आयुष्यात काहीच नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असे अनेक शिक्षक आहेत जे त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे नेण्याचं काम करत असतात. आपल्या शिक्षकांसाठी, आपण शिक्षक दिन साजरा करत असतो. हा विशेष दिवस दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो. या विशेष दिवशी बॉलिवूडचे काही चित्रपट आपण पाहिले पाहिजेते कोणते हे आज जाणून घेऊया.
2 / 6
या यादीतील पहिला चित्रपट आहे ‘हवा हवाई’, हा चित्रपट एका मुलाची कथा आहे जो खूप छान स्केट करतो. स्केटिंगचं कौशल्य असूनही हा मुलगा दुकानात लोकांना चहा विकतो. अनिकेत (साकिब सलीम) या चित्रपटात त्याच्या शिक्षकाची भूमिका साकारताना दिसतो जो मुलाला मोठं होण्यास मदत करतो. हा चित्रपट पाहून आपल्याला कळतं की आयुष्यात कितीही वाईट टप्पा आला तरी आपण कधीही हार मानू नये.
3 / 6
‘चिल्लर पार्टी’ या चित्रपटात मुलांची टोळी पहिल्यांदा दाखवण्यात आली. जे रस्त्यावर राहणाऱ्या प्राण्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रकारच्या नवीन कल्पनांचा शोध घेतात.. हा चित्रपट बघून असं दिसून येतं की जर आपल्याला हवं असेल तर आपण या जगात काहीही करू शकतो. हा चित्रपट मुलांमध्ये करुणा जागृत करतो.
4 / 6
‘निल बट्टे सन्नाटा’च्या कथेत, आपण स्वरा भास्करला एका आईच्या भूमिकेत पाहिलं जी आपल्या मुलीला शिक्षण देऊ इच्छिते कारण तिला आपल्या मुलगीला लोकांच्या घरात काम करू द्यायचं नाही. या चित्रपटाचा ट्विस्ट म्हणजे स्वराच्या मुलगीने तिच्या मनात बसवून ठेवलं आहे की एका कामगाराची मुलगी फक्त कामगारच बनू शकते. या पलीकडे तिला काही भविष्य नाही. हा चित्रपट बघून कळतं की एकटी आई आपल्या मुलांसाठी कशी मेहनत घेते आणि त्यांचं संगोपन कसं करते.
5 / 6
बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटानं जगभरात हजारो कोटींचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात चांगलाच आवडला आहे. या चित्रपटात असं दाखवण्यात आलं आहे की फक्त मुलंच नाही तर आपल्या घरातील मुली सुद्धा बाहेर येऊन आपल्या घराचं आणि देशाचं नाव उंचावू शकतात. हा चित्रपट स्त्री शक्तीचा संदेश देतो. हा चित्रपट सांगतो की मुलांनी अभ्यासाबरोबरच खेळांमध्ये खूप सहभाग घेतला पाहिजे.
6 / 6
‘आय एम कलाम’ हा चित्रपट भारतातील प्रत्येक शाळेत दाखवण्यात आला आहे, तो भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावर बनवण्यात आला होता. या चित्रपटात एका बालकामगाराला अभ्यासाची खूप आवड आहे. टीव्हीवर अब्दुल कलाम यांचं भाषण ऐकून तो लहान मुलगा खूप प्रभावित होतो. हे भाषण ऐकल्यानंतर हा मुलगा स्वप्न पाहतो की तो वाचन आणि लेखन करून मोठा माणूस होईल. मुलांना हा चित्रपट खूप आवडतो.